Friday 9 March 2018

(Preaparing to benefit from the ports of Ratnagiri and Jaigad !)रत्नागिरी & जयगड पोर्टस ... एक सुवर्ण संधी !


10th March 2018

☺️☺️ लिस्ट मिळाली हो, पण पुढे काय ?☺️☺️

तर हे करायचं, पहिली पायरी म्हणून ....

1. एकत्र यायचं, डोकं घालायचं, खूप मोठ्ठा बदल हवाय आपल्यात हे समजून घ्यायचं !

2. बदल इतका की आपण कमी कसे पडतो ह्याचंच आपण कौतुक करतो ते आता पुरे झालं आणि आलेल्या संधीचा एकत्र सर्वांना फायदा कसा होईल ह्याची सामूहिक आणि घरा घरात वैचारिकता आणायची !

3. एका लेखानी किंवा एका बैठकीनी काही नाही होत हे लक्षात घ्यायचं. ही फक्तं सुरुवात.

4. ज्या धार्मिक, जातीय, आर्थिक उच्च निचता, फसवेगिरी, खोटं बोलणं, बारीकसारीक लबाड्या , कचखाऊ आणि कचखाऊ पणा ह्यांनी आपणच आपल्या हातानी कशा संधी घालवतो ते समजून घ्यायचं.

5. खरं देशप्रेम असेल तर प्रत्येकाला त्यासाठी काहींना काही करता येतं हे लक्षात घ्यायचं, आपण मात्र फार हुशार आणि इतर मूर्ख हा स्वभाव सोडायचं.

6. आपल्या बुद्धीचा अधिकार गुलामासारखा कोणा फायदा घेणाऱ्याच्या हाती द्यायचा नाही. आणि त्याच वेळी पोकळ अभिमान शिकण्यामध्ये आणून द्यायचा नाही.

7. देशाचं भलं हवं तर आधी स्वतः आपला प्रांत, आपलं गाव, आपली आळी, आपलं घर, आपलं कुटुंबं, आपण स्वतः त्यासाठी शारीरिक - मानसिक - स्किल्स येणं - सामाजिक वागणूक ह्या अनेक अंगांनी जागतिक विकासाच्या च्या गरजांना अनुरूप असं घडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करायचा.
8. एकमेकांच्या मागे प्रॉब्लेम्स लावून देण्याची खासियत ताबडतोब थांबवायची.

9. दुसऱ्याचं बरेवाईट झालं की मनोमन आनंदी व्हायचं नाही उलट आपल्या टीम मेंबर ला मदतीला जायचं.

10. आणि मग समजून घ्यायचं की ही लिस्ट काय आहे ते, ती उत्तम चालण्यासाठी स्वतःचा प्रातं दुसऱ्याच्या खाबूगिरीत जाण्या आधी एकत्रित पणे काय करता येईल हे.

11. आपण काही लिस्ट मधल्या सगळ्या गोष्टी करू शकणार नाही आहोत, पण भारतीय घटनेत बसेल असं आपण काय करू शकू की प्रत्येक जण शांत डोक्यानी अशा प्रकारे प्रगतीला हात लावू की जगातले इतर प्रांत आमचा सल्ला विचारतील.

12. विविध संघटना एखाद्या माणसालाच त्याचं श्रेय द्यायला जातील पण त्यांनी स्वतःचेच हार तुरे घेणारे फोटो न घेता ह्या प्रांतातल्या प्रत्येकाचा मुंगीच्या वाटा त्यात आहे हे विसरायचं नाही आणि कायम सगळ्यांचे आभार मानायचे.

13. रस्त्याला नाव काय, पोर्टला नाव काय ह्यावरून एकमेकांची डोकी फोडायची नाहीत.

14. प्रांतात काही सौंशयास्पद देशविरोधी दिसलं तरी ते योग्य यंत्रणेच्या कानी जाईल हे बघायचं.

15. ही लिस्ट पुढे न्यायला शिस्त म्हणून सिंगापूर चं उदाहरण घेउया आणि पोर्ट चा पसारा वाढवायला रॉटरडॅम बंदराचं उदाहरण घेऊया आणि आपल्या स्वतःला ह्याचा फायदा होणार, अपम्य पुढच्या पिढ्यांना फायदा होणार, आपल्या महाराष्ट्राला फायदा होणार, आपल्या भारत देशाला फायदा होणार म्हणून एकत्र पाऊल पुढे टाकूया.

अकॅशन तुम्ही घ्यायचीय, देश स्वतंत्र आहे, तुमचा आहे, तेंव्हा आता दुसरे काही आपल्यासाठी करतील हे विसरून जायचं. मागाहून रडत बसायचं नाही.....

देवा नमहाराजा, उपरवाले - होईल कारे हा बदल आमच्या कोकणात आणि महाराष्ट्रात ? होय महाराजा !!

नम्र नमस्कार - कॅप्टन. उपेंद्र श्री. गोगटे

10. 03. 2018 ( भारता बाहेरून लिहिलेला ब्लॉग).

Saturday 3 March 2018


                          Opportunities brought by the ports of Ratnagiri and Jaigad !